गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (14:06 IST)

ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयकुमार नाईक यांचे निधन

ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयकुमार विश्वनाथ नाईक यांचे वयाच्या 59 व्या वर्षी काल सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ते विजू नावाने ओळखले जात होते. 

विजय कुमार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते रुग्णालयातुन घरी आले मात्र काल त्यांना अस्वस्थता जाणवली असून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आले असून त्यांची प्राणज्योत मालवली . 

त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिन झाला. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी नाटकांत  प्रवेश केला. त्यांनी वडील विश्वनाथ नाइकांसोबत रायगडाला जेव्हा  जाग येते या नाटकांत छत्रपती संभाजी यांची भूमिका साकारली. तेव्हा पासून त्यांचा नाटकातील प्रवास सुरु झाला. 

नाटक करताना ते त्यात रमून जायचे. त्यांना वडील ज्येष्ठ रंगकर्मी विश्‍वनाथ नाईक तसेच बंधू सोमनाथ, दिलीपकुमार आणि रवींद्र यांचे मार्गदर्शन लाभले.  
 
विजयकुमार यांनी अनेक नाटकांत भूमिका साकारल्या त्यांनी स्वतः दिग्दर्शन करत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक नाट्यप्रयोग केले. त्यांना कला अकादमी नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळाली. त्यांनी शंभरहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी बालनाट्ये, एकांकिका, एकलनाट्य, मूकनाट्य देखील यशस्वीपणे केले.   

रायगडाला जेव्हा जाग येते, ययाती आणि देवयानी, मत्स्यगंधा, अहिल्योद्धार, हॅम्लेट, कोहंम, पाण्याखालचे बेट, दी एम्परर जोन्स, कोर्ट मार्शल व अलीकडचे पालशेतची विहीर इत्यादी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. अनेक मोठे कलाकार आणि मंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 
Edited by - Priya Dixit