रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (15:06 IST)

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी मतदान सुरु

राज्यात आज विधानपरिषदेसाठी पुणे, सांगली-सातारा, गोंदिया, नांदेड, यवतमाळ, जळगाव या मतदार संघामध्ये मतदान सुरु आहे. या सहा जागांसाठी ३०  उमेदवार रिंगणात असून मतमोजणी २२  तारखेला होणार आहे.

पुण्यासह सर्व ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तर सध्या चार मतदारसंघात राष्ट्रवादी तर प्रत्येकी एका मतदारसंघांत काँग्रेस आणि भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाचा फायदा शिवसेना, भाजपला होणार का याची उत्सुकता आहे.