प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु
भारताच्या परम या पहिल्या सुपर कम्प्युटरची निर्मिती करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अमेरिकेकडून भारताला सुपर कम्प्युटरची विक्री करण्यास नकार देण्यात मिळाल्यानंतर भटकर यांनी ‘परम’ या स्वदेशी सूपर कम्प्युटरची निर्मिती केली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.२५ जानेवारी २०१७ पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु असतील. काही दिवसांपूर्वीच सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद सोडले होते.
विद्यापीठाच्या तत्कालीन हंगामी कुलगुरू व्हीसी गोपा सभरवाल यांच्या अचानकपणे करण्यात आलेल्या उचलबांगडीच्या मुद्द्यावरून नाराजी दर्शवत जॉर्ज यिओ यांनी कुलगुरूपद सोडले होते.