गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (12:38 IST)

शिक्षक-शिक्षकेतरांची 4,738 पदे भरणार

विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याचबरोबर तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाध्येसुध्दा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणंत्री विनोद तावडे यांनी दिली.
 
राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त असल्याबाबत चर्चा ही सर्वदूर सुरु होती. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्त्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. अध्यापकांच्या 3,580 जागा, शारीरिक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा साहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4,738 पदे येत्या काळात भरण्यात येतील, असेही तावडे यांनी सांगितले. तसेच तासिका तत्त्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे.