गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2017 (14:52 IST)

शिक्षणमंत्र्यांची भूमिका विद्यार्थीविरोधी -राष्ट्रवादी

सोलापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडण्याच्या मार्गावर असून आपल्या शिक्षणाचे पुढे काय होणार या चिंतेने काही विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद न करण्याची विनंती शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांच्याकडे केली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या विनंतीकडे लक्ष न देता तावडे यांनी विद्यार्थ्यांना कॉलेज बंद पाडण्याची धमकी दिली.याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुलडाणा, अकोला, अमरावती येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निखील ठाकरे, अमरावतीचे शहराध्यक्ष आकाश हिवसे, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष अंकुश गोंडचवर, कार्याध्यक्ष निशांत पाटील आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना धमकावण्याआधी स्वतःची शैक्षणिक पात्रता सिद्ध करावी, असे आव्हान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिले आहे.