सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 15 मे 2023 (11:13 IST)

अकोल्यानंतर अहमदनगरमध्ये हिंसाचाराचा भडका, धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक, 8 पोलीस जखमी

Violence erupted in Ahmednagar
महाराष्ट्रात अकोल्यानंतर आता अहमदनगरमधून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे रविवारी रात्री धार्मिक यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर हिंसाचार आणि दगडफेक झाली. या हिंसाचारात आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या धार्मिक यात्रेसाठी आधीच अतिरिक्त पोलीस, एसआरपीएफ फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
50 जण ताब्यात
हिंसाचार आणि दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
मिरवणुकीवर दगडफेक
वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, एका गटाने मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. यानंतर अन्य गटाकडून धार्मिक स्थळावर दगडफेकही झाली आणि हिंसाचार उसळला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेतले आहे. अहमदनगरमध्ये गेल्या महिनाभरातील हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे. गेल्या एप्रिलमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीने हिंसाचाराचे रूप धारण केले होते. यादरम्यान दगडफेक झाली आणि अनेक वाहने जाळण्यात आली. याठिकाणी दोन लोकांमध्ये वाद इतका वाढला की त्याचे रुपांतर हाणामारीचे झाले.