Sanjay Raut :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ,संजय राऊतांवर गुन्हा दाखल
शिवसेना खासदार संजय राऊत हे आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत येतात आता पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेलं वक्तव्य त्यांना भोवले आहे. त्यांनी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार वर केलेल्या वक्तव्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ते म्हणाले राज्याची सरकार बेकायदेशीर असल्यामुळे पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचं पालन करू नये. तसेच जनतेने देखील सरकारच्या नियमांचे पालन करू नये. संजय राऊतांनी राज्य सरकारच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते म्हणाले सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिला आहे. ही सरकार अपात्र आमदारांच्या भरवश्यावर चालत आहे. न्यायालयाने ही सरकार बेकायदेशीर अशी ठरवली आहे. त्यामुळे जनतेने आणि पोलीस आणि अधिकाऱ्याने या सरकारच्या कोणत्याही नियमांचे पालन करू नये. असे राऊतांनी आवाहन केले असून त्यांच्यावर नाशिक पोलिसां कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by - Priya Dixit