गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (20:43 IST)

सत्ता संघर्ष बाजूला, अजित दादांनी केली मद्य उत्पादक कारखान्यांच्या पाहणी

ajit pawar
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी राजकीय कार्यक्रम टाळून कुणाला कळू न देता  थेट  नाशिकमधील दिंडोरीतील मद्य उत्पादक कारखान्यांच्या पाहणीसाठी आले  होते. दुसरीकडे सोबतच  ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत आदी नेत्यांचे गर्दी होती. 
 
या घटनाक्रमात सकाळी अजित पवार हे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात दाखल झाले. सकाळी साडेसात वाजता ओझर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. विमानतळातून बाहेर पडताना ताफ्यातील तीन वाहने आधी वेगळ्या दिशेने गेली.नंतर अजित पवार हे वेगळ्या वाहनातून दिंडोरीकडे मार्गस्थ झाल्याचे सांगितले जाते. प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी दादांनी हा मार्ग अवलंबल्याचे समजते. अजित पवार यांच्या वाहनाच्या काचेला पडदा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत कोण आहे, याची स्पष्टता झाली नाही.
 
वलखेड फाट्यालगतच्या पेकॉर्ड इंडिया या मद्य निर्मिती कंपनीत जवळपास तासभर त्यांनी पाहणी केली. नंतर दादांच्या वाहनाचा ताफा साडेदहा वाजेच्या सुमारास याच भागातील युनायटेड स्पिरिट कंपनीत (सिग्राम) पोहोचला. या काळात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद टाळला. दादांचा हा खासगी दौरा आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित राहिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

Edited by : Ratnadeep Ranshoor