शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Mangao चुकीच्या पद्धतीने आंबा खाणं ठरेल जीवघेणं

mango soaked in water
आंब्याशिवाय उन्हाळी हंगाम अपूर्ण असतो आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण त्यांची वाट पाहत असतो, म्हणूनच आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. तुमच्यापैकी अनेकआंबा खाण्यापूर्वी ते 1-2 तास पाण्यात भिजवले पाहिजेत, पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
 
आयुर्वेदानुसार आंबा खाण्यापूर्वी 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवावा जेणेकरुन तुम्हाला पोटाचा त्रास, मुरुमांची समस्या आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. यासोबतच आंबे पाण्यात भिजवून ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, चला जाणून घेऊया फायदे
 
1. खूप जास्त फायटिक ऍसिड कमी होतं
आंब्यामध्ये फायटिक ऍसिड नावाचे घटक आढळतात, जे आपल्या शरीरात लोह, जस्त आणि कॅल्शियमचे शोषण करण्यापासून प्रतिबंधित करतं. आणि आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतं. आंबे 1-2 तास पाण्यात भिजवून ठेवल्याने अतिरिक्त फायटिक ऍसिड निघून जाते.

2. केमिकलचा प्रभाव कमी करतं
आंब्यामध्ये अनेक प्रकारची रसायने आणि कीटकनाशके वापरली जातात, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. आंबा भिजवून ठेवल्याने रासायनिक व कीटकनाशकेचा प्रभाव कमी होतो.
 
3. आंब्याची उष्णता कमी होते
आंबा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतो, त्यामुळे अनेकांना पोटाचा त्रास होऊ लागतो. जर तुम्ही आंबे न भिजवता खाल्ले तर तुमच्या शरीर आणि चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या होऊ शकते.
 
4. वजन कमी करण्यात मदत होते
आंब्यामध्ये फायटोकेमिकल्स असतात, ज्याच्या जास्त प्रमाणामुळे तुमच्या शरीरात वजन वाढू शकते. आंबे पाण्यात भिजत ठेवले तर जास्त प्रमाणात फायटोकेमिकलचे प्रमाण कमी होते.