रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (15:23 IST)

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी औरंगाबादचेही मतदार मतदान करणार

voters
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे व शशी थरूर यांच्यात निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी औरंगाबादचेही मतदार मतदान करणार आहेत.
 
१७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे मतदान होईल. महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या ५६५ आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत, त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. स्वीकृत सदस्यांना हा अधिकार नाही, असे मुंबईच्या टिळक भवनाचे अधीक्षक नामदेव चव्हाण यांनी सांगितले.
 
डॉ. जफर खान, एम. एम. शेख, डॉ. कल्याण काळे, डॉ. जितेंद्र देहाडे, अनिल पटेल, सुभाष झांबड, प्रकाश मुगदिया, नारायण जाधव पाटील, किरण पाटील डोणगावकर, विलास औताडे, नामदेव पवार, आबेद जहागीरदार व विजयकुमार दौड हे औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार असून, त्यांना मतदानासाठी १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत टिळक भवनात हजर राहावे लागणार आहे.

Edited By - Ratandeep Ranshoor