शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (13:12 IST)

शेतकऱ्यांसाठी या योजनेतून 3 लाखाचं अनुदान

शेतकऱ्यांसाठी शासन वेगवेगळे उपाय योजना करत असते. पूर असो किंवा अकाळ असो त्याच्या सर्वात जास्त फटका बळीराजाला पडतो. शेतकरी संपन्न व्हावा आणि त्याचे उत्पादन वाढावे या साठी शासन काही नकाही योजना राबवत असते. शेतीसाठी पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सिंचनचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी विहीर योजनेवर भर दिला. जेणे करून पाणी मुबलक असल्याने सिंचनासाठी व्यवस्थित मिळेल. आणि शेतकऱ्यांना जास्त पिकाची लागवड करता येईल. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवाना विहीर बांधण्याच्या कामासाठी 2 लाख 99 हजाराचे अनुदान देण्यात येत होते. आता त्या अनुदानात शासनाने वाढ केली असून आता शेतकऱ्यांना 3 लाखापेक्षा अधिकच अनुदान देण्यात येईल. विहीर योजनेचा लाभ शेतकरी घेत आहे. अनुदान वाढवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या विहीर योजनेचा लाभ शेतकरी बांधव घेत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका स्तराच्या कार्यालयाशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रे देऊन अर्ज सादर करावा लागतो. असे अनेक शेतकरी बांधव आहे. ज्यांच्याकडे शेतीसाठी जमीन आहे पण त्याला सिंचन करण्यासाठी मुबलक पाणी नाही. असा परिस्थितीत त्यांच्या कोरड्या जमिनीवर पाण्याअभावी शेती करता येत नाही. या साठी शासनाने विहीर योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ कोणीही शेतकरी घेऊ शकतो. 
 
Edited By - Priya Dixit