मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , शनिवार, 11 डिसेंबर 2021 (12:35 IST)

विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या

वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील सरस्वती मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दररोज जेवणात अळ्या निघत असल्यानं विद्यार्थाना उपाशी राहावं लागतंय.
 
एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापककडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.
 
येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे 
या वसतिगृहात ANM,GNM,B.Sc आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विदर्भातून येतात. 6,450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो. सोयी सुविधेच्या नावांवर विद्यार्थांना अळ्यांचे जेवण आणि नास्ता मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृह प्रशासनाविरोधात चांगलाच रोष दिसून येतोय.