वर्ध्यात स्कूल व्हॅन उलटली; अनेक विद्यार्थी जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रातील वर्ध्यात करंजी-काजीजवळ भरधाव कारने स्कूल व्हॅनला धडक दिली. या अपघातात पंधरा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धडक इतकी जोरदार होती की व्हॅन रस्त्यावर उलटली. हा अपघात सोमवार रोजी सकाळी करंजी-काजीजवळ घडला. अपघातानंतर वाटसरूंनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच, सेवाग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीत आहे.
Edited By- Dhanashri Naik
Edited By- Dhanashri Naik
