गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:48 IST)

मुंबई : दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू

मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी  सकाळी हा प्रकार घडला आहे. बुडालेली तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दादर चौपाटीवर  सकाळी फिरायला गेलेली तीन शाळकरी मुलं बुडाली. माहिम पश्चिमेला राहणारी तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकत होती. अनुपकुमार यादव(16), भरत हनुमंता(13) आणि रोहितकुमार यादव(15) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. बुडालेल्या तीनही मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. यात भाभा रुग्णालयात तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.