शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (09:29 IST)

काळम्मावाडी धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून पाणी विसर्ग सुरु

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी (दूध गंगानगर) येथील राजर्षी शाहू धरणात ७९.१८ टक्के (२०.१० टी.एम.सी) इतका पाणी साठा झाला आहे. गेले तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. धरणाची पाणी साठा क्षमता २५ टी.एम.सी. इतकी असल्याने धरण भरण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. मात्र पुढील दक्षतेसाठी धरणाच्या वक्राकार दरवाजातून ४२५ क्युसेक व जल विद्युत केंद्रातून १००० क्युसेक असा १४२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात सुरू केला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.