1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:40 IST)

शहरातील ‘या’ भागांत आता दुपारी पाणी येणार !

water supply in afternoon in nasik from today
नाशिक शहरातील काही भागांत आता दुपारी पाणी येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
 
प्रभाग क्रमांक १२ मधील शरणपूर गावठाण, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी परिसरात गुरुवारपासून दुपारी बारा ते तीन या कालावधीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
 
प्र. क्र. १२ मधील जलशुद्धीकरण केंद्र येथील १० फुटी जलकुंभ तोडून त्या ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्राकरिता फिल्टर हाउस तथा एमबीआर बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामूळे या जलकुंभावरून पाणीपुरवठा पर्यायी व्यवस्था चार लाख गॅलन जलकुंभावरून करण्यात आली आहे. त्यामुळे टिळकवाडी, महावीर कॉलनी, शरणपूर गावठाण, कॅनडा कॉर्नर, बेथेलनगर, रचना हायस्कूल परिसरास सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार पाणीपुरवठा आता गुरुवारपासून (दि. ४) दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत होणार आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor