1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (15:57 IST)

आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही. समोरुन वार करतो ; संजय राऊत

We are not stabbing
अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता.त्याला आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही. समोरुन वार करतो असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 
 
संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतानाच विविध राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले. राऊत म्हणाले, अजित पवार संध्याकाळपर्यंत परत येतील हे आम्ही त्यावेळीही सांगितले होते.आणि आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही, समोरुन वार करतो अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार केला.याचवेळी त्यांनी माझं नातं शिवसेनेशी आहे. सत्ता असली किंवा नसली तरी आमचं नातं सेनेशीच आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत, असेही राहुल यांनी यावेळी स्पष्ट केले.