मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (21:57 IST)

विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे - अजित पवार

विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे आहोत. फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या हिताचं काय? भावी पिढीच्या भवितव्याचं काय? हा विचार करा. काळजी करू नका अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचं नाही असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
आज नगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 
घटना घडत असतात. कोण जात असतं येत असतात. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून आम्हाला संधी मिळाली. अठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्ष पद पवारसाहेबांनी दिले. पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिले. त्यांच्याबरोबर अनेकांनाही दिली आणि ही पदे साहेबांमुळे मिळाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 
आमचे सहकाराशी आपलेपणाचे नाते आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर लहानपणातच सहकाराची जबाबदारी आली होती. पवारसाहेबांनी वसंतदादा यांच्यानंतर सहकाराला आधार दिला हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 
वेगवेगळ्या प्रकारे मागण्या पूर्ण करण्याचे काम राष्ट्रवादीमय जिल्हा होता म्हणून काम केले.
वैभव पिचडला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं भवितव्य आहे परंतु काय झालं माहित नाही त्याने पक्षप्रवेश केला. ग्रामीण भागात काटयाने काटा काढायचा असतो ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचा आमदार मिळाला. राष्ट्रवादीचा आमदार यावा म्हणून प्रयत्न झाला. नगर जिल्हयात चांगली साथ मिळावी. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या जिल्हयाने साथ दिली. आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. सत्ता चालवताना अनुभवी लोक लागतात असेही अजित पवार म्हणाले. 
नगर जिल्हा बँकेत काहींनी गम्मत केली. कशी व कुणी केली हे मला माहीत आहे. थोडे दिवस जाऊदे नंतर बघतो एकेकाला असा सज्जड दम अजित पवार यांनी यावेळी भरला.