शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (20:41 IST)

आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, शिंदे यांचा टोला

eknath shinde
गोविंदा थर लावून हंडी फोडतात, मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. शिंदे पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा पण दिला, लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
 
अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याचे यावेळी मु्ख्यमत्र्यांनी सांगितलं.
 
टेंभी म्हणजे गोविंदाची पांढरी आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केलं. धर्मवारी आंनद दिघे बोले होते की ठाण्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे. दिघे यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.