शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (13:32 IST)

Dahi Handi 2022 :दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज 9 थरांचा रिकॉर्ड तुटणार का ?

dahi handi
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडीच्या उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. गोकुळाष्टमीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षी कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले असून गेल्या दोन वर्ष सर्वच सण कोरोनाच्या सावट खाली साजरे केले गेले. आता यंदाच्या वर्षी भाविकांमध्ये विशेषतःगोविंदांमध्ये मोठ्या  प्रमाणात उत्साह असून दहीहंडीसाठी प्रमुख आयोजकांनी कंबर कसलीय. राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा दहीहंडीचं आयोजन केलं आहे. गोकुळाष्टमीला काही नियमावली लागू करण्यात आली आहे. गोविंदा पथक उंच मनोरे रचण्यासाठी सज्ज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यंदा गोविंदा पथक 9 थरांच्या मनोरा रचणाऱ्या दहिहंडीचं रिकॉर्ड मोडणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.