शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी देण्याची पटोले यांची मागणी
राज्य सरकारने शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधिमंडळातील चर्चेत नाना पटोले गुरुवारी बोलत होते. महागाईने जनता त्रस्त असून डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. हे शेतकऱ्यांना परवडणारं नसून राज्य सरकारने डिझेलवर सबसिडी देण्याचा विचार करावा, असं पटोले म्हणाले.
जीएसटीची व्याप्ती वाढवून केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूही त्याच्या कक्षेत आणत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर जास्तच आहेत, ते कमी करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.