सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (09:49 IST)

राष्ट्रवादीच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार - रणजितसिंह निंबाळकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे केंद्रीय तपास यंत्रणांना देणार असल्याची माहिती माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे. इतकंच नव्हे तर यापैकी पाच जणांची कागदपत्रे आपल्याकडे तयार असल्याचंही निंबाळकर म्हणाले आहेत. टेंभुर्णी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप यावेळी निंबाळकर यांनी केला.
 
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार याना क्लिनचिट देण्यात आल्याचा आभास निर्माण केला जात आहे. पण जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचं मत नाईक-निंबाळकर यांनी मांडलं.