सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (09:10 IST)

शिर्डी परीसरात आठ दिवसात फाशी घेऊन दोन आत्महत्या

suicide
आठ दिवसात निमगाव कोर्‍हाळे व पिंपळवाडी या गावात ३२ ते ३५ वयोगटातील तरुणांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनाचा धक्कादायक शेवट केल्याचे पुढे आले आहे. पिंपळवाडी गावात राहणाऱ्या शरद बापुसाहेब शेळके या इसमाने १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता मृत म्हणून घोषित करण्यात आले असून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ७४/२०२२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहे

तर दुसऱ्या घटनेत निमगाव कोराळे शिवारात क्रांती चौकात राहणारा योगेश भाऊसाहेब नागरे वय ३२ याने आठ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरात लोखंडी छताच्या पाईपला नाॅयलान दोरी बांधून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली तशी खबर मयताचा भाऊ संदिप नांगरे याने शिर्डी पोलिसांत दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदीप डमाळे हे करीत आहे आठ दिवसात झालेले या दोन आत्महत्या मुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे या दोन तरुणांनी आत्महत्या का केली मागे काय कारण आहे कुठल्या कारणामुळे या तरुणांनी एवढ्या शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहे.