बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (08:12 IST)

राहुल गांधी आपल्या बहुचर्चित पदयात्रेसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात येणार

rahul gandhi
राहुल गांधी आपल्या बहुचर्चित पदयात्रे साठी  येत्या नोव्हेंबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत. या दौऱ्यानिमित बुधवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार, खा. राहुल गांधी २० नोव्हेंबर रोजी शेगाव येथे मुक्कामी असतील. त्यानंतर पुढील दोन दिवस जळगाव जामोद मतदारसंघातून त्यांची पदयात्रा जाणार आहे. यानंतर २३ नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही पदयात्रा महाराष्ट्रात आल्यावर नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बाळापूरमार्गे शेगाव, जळगाव जामोद येथे दाखल होणार आहे. येथून ही पदयात्रा मध्यप्रदेशकडे रवाना होईल.