मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (17:55 IST)

दहीहंडीसाठी नियम जाहीर

dahi handi
दहीहंडी या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारनं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून याबाबत विधानसभेत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता 'प्रो कबड्डी'च्या धर्तीवर 'प्रो दहीहंडी' हा खेळ सुरु होणार असल्याची चर्चा रंगली आहे. 
 
दहीहंडीचा उत्सव उद्या (19 ऑगस्ट) साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दहीहंडी उत्सव संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, पुण्यात रात्री 10 वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मंडळांना आवाजाची मर्यादा देखील घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल््या आहेत. दरम्यान, दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.