मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Updated: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (17:58 IST)

Independence Day : हृदयी प्रेम तिरंग्याचे ,मनी मानसन्मान आहे

हृदयी प्रेम तिरंग्याचे ,मनी मानसन्मान आहे,
ऋण हुतात्म्यांचे, गमावले त्यांस , याची जाण आहे,
अमृत महोत्सव बघणे हे भाग्य मिळाले,
करू जल्लोष उत्सवाचा, पावन पर्व आले,
फुगली छाती गर्वाने, असें कार्य सैनिकांचे,
ते आहेत म्हणोनी, जीवन सुरक्षित अमुचे,
कशी होईल उतराई त्यांच्या बलिदानाची,
सैनिक आहे आन बान शान या भारताची.
घडावा सैनिक प्रत्येक घराघरात असा,
मगच राहील चालत पुढं पुढं हा वारसा!
मानवंदना माझी सदैव चरणी त्यांच्या,
ताठ मानेने उंच राहील माना आमुच्या!!
...अश्विनी थत्ते