शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. स्वातंत्र्य दिन
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (22:03 IST)

Independence Day 2022: भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन' शी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

Independence Day 2022: सध्या सर्वत्र 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्यासाठी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे,
 
जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर देशाचे राष्ट्रगीत गायले जाते. अशी पद्धत असते आपल्या देशाप्रती अभिमान व्यक्त करण्याची . त्याचप्रमाणे भारतातही ध्वजारोहणानंतर 'जन गण मन' हे राष्ट्रगीत गायले जाते. शाळेतील प्रार्थनेत मुलांना लहानपणापासूनच राष्ट्रगीत शिकवले जाते.
 
भारताचे राष्ट्रगीत हे प्रसिद्ध भारतीय कवी आणि नाटककार रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनातून घेतले आहे. तथापि, ते मूळ बंगाली भाषेत 'भारतो भाग्य बिधाता' या शीर्षकाने लिहिले गेले. विशेषत: कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत देशाची धार्मिक आणि प्रादेशिक विविधता आणि एकता दर्शवते.चला आपल्या राष्ट्रगीताशी निगडित काही 10 मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ या.
 
भारतीय राष्ट्रगीताबद्दल 10 मनोरंजक तथ्ये  -
1 डिसेंबर 1911 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' प्रथमच गायले गेले होते. 
2 भारतीय राष्ट्रगीताच्या मूळ ओळी बंगाली भाषेत लिहिल्या गेल्या होत्या आणि संपूर्ण गीतामध्ये 5 श्लोक आहेत. 
3 5 श्लोकांपैकी, फक्त पहिला श्लोक सामान्यतः संपूर्ण भारतातील नागरिकांद्वारे ओळखला जातो आणि गायला जातो. 
4 1919 मध्ये, "मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया" या नावाने भारतीय राष्ट्रगीताचे इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यात आले. 
5 1905 मध्ये प्रथमच राष्ट्रगीताचा मजकूर तत्वबोधिनी मासिकात प्रकाशित झाला. 
6 नेताजी सुभाष चंद्र बोस हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 11 सप्टेंबर 1942 रोजी जर्मन-इंडियन सोसायटीच्या बैठकीत "जग गण मन" हे 'राष्ट्रगीत' म्हणून जाहीर  केले होते. 1950 मध्ये 'जन गण मन' ला औपचारिकपणे राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला. 
7 भारतीय राष्ट्रगीत "जग गण मन" हे सुमारे 52 सेकंदात गायले जाऊ शकते. 
8 राष्ट्रगीताची हिंदी आवृत्ती 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने स्वीकारली. 
9 भारताचे राष्ट्रगीत निवडण्याचे श्रेय नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाते कारण ते राष्ट्रगीत निवड समितीतील प्रमुख व्यक्ती होते. 
10 राष्ट्रगीताचे हिंदी-उर्दू आवृत्तीत भाषांतर करण्याचे श्रेय कॅप्टन आबिद हसन सफरानी यांना जाते.ज्याचे मुळ शीर्षक 'सुख चैन' असे आहेत.