बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (08:20 IST)

भास्कर जाधव मुद्दे मांडत असताना नितेश राणे मध्येच बोलल्याने वाद

रवींद्र चव्हाण आणि सुनील प्रभू यांच्या प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. भास्कर जाधव आपले मुद्दे मांडत होते. मात्र. नितेश राणे मध्येच भास्कर जाधवांना टोकताना दिसले. त्यामुळे मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणे यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.

जाधव मुद्दे मांडत असताना राणे मध्येच बोलल्याने वाद
“मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तर देतात, असा टोला जाधव यांनी राज्य सरकारला लगावला. २०२३ हा आकडा कायम आहे, परशूराम घाटाचा विषय कायम आहे, लोकांच्या कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे. कोर्ट कचेरी पनवेल ते इंदापूर थोडीशी आहे, बाकी कुठे नाही, असे आपले मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो”, असे भास्कर जाधव म्हणाले.