शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (15:37 IST)

आम्ही पार्टी सोडलेली नाही, पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे: गुलाबराव पाटील

Shiv Sena rebel MLA Gulabrao Patil made a big statement
शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे, असं विधान त्यांनी केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केलं आहे. धनुष्यबाण कोणाचा आहे? न्यायालयात काय निर्णय होईल? असे प्रश्न विचारले असता, गुलाबराव पाटील म्हणाले, न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसं बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. तसेच आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे.”
 
पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा? असे प्रश्न पडले असते. मात्र, शिवसेना पक्षानं नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे” असं मोठं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.