मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (08:10 IST)

स्वातंत्र्यवीर सावरकरांना लोकशाही वेगळी अभिप्रेत होती- अभिनेते शरद पोंक्षे

सार्वजनिक वाचनालय,नाशिकच्या वतीने शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्याने पहिले पुष्प गुंफण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना लोकशाही वेगळी अभिप्रेत होती ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षाची सज्ञान होईपर्यंत भारतात लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वंयम  अधिकार ज्ञात करून दिल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नव्हती. आपण लष्करी दृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्या शिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. दुबळ्या माणसांच्या हातात अहिंसेने कधी काही साध्य करू शकत नाही. इंदिरा गांधीनी ज्यावेळेला भारताने अणुबॉम्ब तयार केला त्यानंतरचे सर्व युद्धे आपण जिंकली. आपल्या सीमासुरेक्षेचे काम हाती घेतले त्यामुळे इतर राष्ट्रातून येणाऱ्या घुसखोऱ्यावर  आळा बसला आहे. आपण माणस शिक्षित होतो, ज्ञानी होतो आपल्याला ज्ञान प्राप्त होते, आपण माहितीसाठी गुगल वर हवी ती माहिती शोधू शकतो परंतु आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीची बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे आहे. त्यांनी काही सूचना केल्या. 
 
१ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्यबलाढ्य करण्यासाठी शास्त्र अणुबॉम्ब तयार करावेत त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांना ट्रेनिंग द्यावे.
२ देशाची सुरक्षा करणारे पोलीस आणि सैन्यबळ यांना उत्तम पगार द्यावेत जेणे करून ते सक्षम बनतील कारण तेच खऱ्या अर्थाने देशाची सुरक्षा करणारे आहेत त्यासाठी त्यांची जीवन शैली व्यवस्थित राहणे गरजेचे आहे.
३ तरूण पिढी घडविणारी जे शिक्षक आहेत ते खऱ्याअर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात त्यांना सुध्दा उत्तम पगार द्यावेत. सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसे श्रीमंत आणि समृद्ध व्हायला हवी. आजची तरुण पिढी लष्करात जायला तयार व्हायला हवी सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरु केला आहे असे विचार अभिनेते शरद पोंक्षे यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.