बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:09 IST)

आम्ही पुराव्यांच्या आधारे बोलतो, मलिक यांचे आरोप खोटे-एनसीबीचं स्पष्टीकरण

नवाब मलिक यांनी केलेल्य आरोपांवर एनबीसीकडूनही लगेचच प्रत्युत्तर देण्यात आलं. मलिक यांनी केलेले सर्व आरोप एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. एनसीबीनं नियमानुसार कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

एनसीबीनं क्रूझवर छापा टाकून केलेल्या कारवाईत 14 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्या सर्वांची चौकशी केल्यानंतर 8 जणांना अटक केली आणि इतरांना पुराव्याअभावी सोडून देण्यात आल्याचं एनसीबीनं सांगितलं.
 
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एनसीबीनं कारवाई केली होती. ही कारवाई पूर्णपणे नियमानुसार केल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे.
 
मनिष भानुशाली यांना आरोपींना नेण्यास सांगण्यात आलं नव्हतं. पण कॅमेऱ्यांची गर्दी असेल म्हणून त्यांनी तसं केलं असण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले.
 
एनसीबी कोणताही धर्म किंवा जात पाहून कारवाई करत नाही. आम्ही केवळ पुराव्याच्या आधारावर बोलतो, असं एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले.