Weather Report : 11 राज्यांना तुफान पावसासह गारपिटीचा इशारा
सध्या मार्चच्या महिन्यात देखील काही राज्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना उन्हाच्या झाला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 40 च्या पुढे गेला आहे. तर देशातील काही राज्यांत पाऊस सुरु आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर-पश्चिम भारतातील हवामान बदलणार असून 13 मार्च आणि 14 मार्च रोजी जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंडात विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर बुधवार 13 मार्च रोजी चंदीगड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेशातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये हलके पावसाची शक्यता वर्तवली आहे.
येत्या शुक्रवार आणि शनिवारी 16 आणि 17 मार्च रोजी झारखंड, मध्यप्रदेश, आणि छत्तीसगडच्या भागात हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडे नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, आसाम, त्रिपुरा या भागात पुढील तीन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल आणि किमान तापमानांत वाढ होण्याची शक्यता आहे.
Edited by - Priya Dixit