मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (17:12 IST)

Weather Report : मुंबईसह 11 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कुठं हलक्या पावसाच्या सरी तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. त्यामुळे या ठिकाणी वीजेचे खांब कोसळून त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचेही प्रकार घडला. यात कोल्हापूर, सांगली, नाशिक, रत्नागिरी, परभणी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील याच अवकाळी पावसाचा हा आढावा आता संपूर्ण महाराष्ट्र (Monsoon Alert Maharashtra) व्यापला आहे. पुढील 5 दिवस पावसाचे आहेत. मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
 
आज मुंबई, पुण्यासह विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. वरील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पण आकाशात विजा चमकण्याचं प्रमाण अधिक असू शकतं.
 
त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली आडोशाला उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. उद्याही राज्यात हीच स्थिती राहणार असून वरील अकरा जिल्ह्यांना उद्याही येलो अलर्ट जारी केला आहे. पण राज्यात इतरत्र मात्र चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार असून, पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे.
 
जुलै महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्यानंतर, राज्यात पावसाचा जोर कमी होत पूर्णपणे उघडीप घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे.