शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (22:00 IST)

महाराष्ट्रतील इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाचं काय?, करुणा मुंडे यांचा सवाल

karuna sharma munde
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला परखड सवाल केला आहे.  करुणा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती. माझ्यावर घटस्फोटाच्या कागदपत्रांवर साईन करुन, लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांग, असा दबाव टाकला होता. मला 50 कोटींची ऑफर दिली, नंतर माझी मुले उचलून नेली. तेव्हाही मी महिला आयोगात तक्रार दिली होती, रुपाली चाकणकर यांनी काहीच कारवाई केली नाही. मी परळीला पत्रकार परिषद घेण्यासाठी गेल्यावर माझ्या गाडीत बंदूक ठेवली. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाही काहीच कारवाई केली नाही. ते सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते.'
 
सुषमा अंधारेंना जळगावात पोलिसांनी केवळ विचारपूस केली. मात्र, आज महाविकास आघाडी सरकार असतं तर सुषमा अंधारेंना थेट तुरुंगात टाकलं असतं. खासदार नवनीत राणा, केतकी चितळे, करुणा मुंडे या महिलांवर महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अन्याय झाला. त्यामुळे, केवळ एका महिलेच्या नावाने गळा फाडणाऱ्या महिलांनी बहुवचन न लावता, केवळ एक पक्षाच्या नेत्या, किंवा संबंधित महिलेबद्दल बोलावे, ज्यावेळी आपण बहुवचन लावता तेव्हा महाराष्ट्रातील सर्वच महिला भगिनी त्यात येतात. मग, करुणा मुंडेंही त्यामध्ये येते. त्यामुळे, महाराष्ट्रतील इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाचं काय? असा परखड सवाल करुणा मुंडे यांनी विचारला आहे. 

Edited by-Ratnadeep Ranshoor