रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (21:11 IST)

काय म्हणता, राज्यात पुढील ४ दिवस विचित्र हवामानाचे राहणार

mansoon
राज्यात पुढील ४ दिवस विचित्र हवामानाचे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या काही भागात गारपीट,अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट अशा विविध प्रकारच्या विषम हवामानाचा प्रत्यय येणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, गेल्या २४ तासात कोकण व अंतर्गत भागात काही ठिकाणी गडगडाटी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. पुढील २ दिवस गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तसेच, राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि हवामानशास्त्र विभागाच्यावतीने दिले जाणारे अपडेटस जाणून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
रविवारी (२४ एप्रिल) पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सोमवारी (२५ एप्रिल) अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात गारपीटीसह पावसाची चिन्हे आहेत. आणि मंगळवारी (२६ एप्रिल) जळगाव, अहमनगर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही गारपीट व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.