सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (21:01 IST)

एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाही

eknath khadse
“आम्ही दीड महिन्यापूर्वी ५० थरांची हंडी फोडली होती” असं विधान केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा अनेक राजकीय नेत्यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीदेखील टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाही, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
 
५० थरांची हंडी फोडल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले की, “एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाहीये. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला कळत नाही. ५० आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली, म्हणजे नेमकं काय केलं? शिवसेनेतून ५० आमदार फोडले आणि त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केलं की भाजपासोबत गेले म्हणून सरकार स्थापन झालं. हे सर्व अर्थ न कळण्यासारखं आहे. त्यामुळे नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे, याचा अर्थ मला तरी निश्चितपणे समजलेला नाही.”