गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 13 मार्च 2021 (15:44 IST)

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे धक्कादायक व्हाट्सएपच्या स्टेटस

मनसूख हिरेन मृत्यु प्रकरणातील संशयित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कुठल्याही क्षणी एटीएसकडून अटक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वाझे यांच्या व्हाट्सएपच्या स्टेटसने खळबळ उडवून दिली आहे. सहकाऱ्यांना दोष देत त्यांनी जगाचा निरोप घेत असल्याचे आपल्या स्टेट्समध्ये म्हटले आहे. मनसूख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्यानंतर एटीएसने मनसूख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
 
आपल्या स्टेट्सवर त्यांनी सहकाऱ्यांवर आरोप केले आहेत. या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले की, 3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली. ती केस अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असे धक्कादायक स्टेटस सचिन वाझेंनी आपल्याला व्हॉट्सअॅपला ठेवले आहे.