1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (21:22 IST)

जेव्हा भाजपला कळेल हे काडीच्या कामाचे नाही तेव्हा भाजप त्यांना फेकून देईन :उद्धव ठाकरे

uddhav
“पण जेव्हा भाजपला कळेल हे काडीच्या कामाचे नाही तेव्हा भाजप त्यांना फेकून देईन. तुम्हाला एकच काम देतोय. नोंदणी नोंदणी आणि नोंदणी. याच्यापलिकडे तुम्ही काही पाहू नका. राजकारणात  कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे काम दिलं ते आठ दिवसात पूर्ण करा. जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम सहानुभूती आहे. तीव्र राग आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा. ही आलेली संधी आहे. एकदा आपण ५० लाखाचा टप्पा पार केला तर नोंदणीचे गठ्ठेचे गठ्ठे घेऊन या. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याती मी दौरे करणार आहे. गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांसोबत घेऊन काम करा असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.
 
“ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. जो बाळासाहेबांचाही होता. मागितलं तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा राहिलो आहे. ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे. तुम्ही सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजप असू दे की हे गद्दार नामर्द असू दे. मला त्यांची पर्वा नाही. ते काही काळ सत्ता उपभोगतील असंही ठाकरे यांनी सांगितलं.