शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (15:21 IST)

बाळासाहेबांनी नेहमीच सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं : मुख्यमंत्री

eknath shinde
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 
गुरूपौर्णिमेला दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सर्वच नतमस्तक होत असतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक वेगळी भावना असते.  गुरूपौर्णिमेच्यानिमित्त स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना वंदन करताना एक मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. यामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा यामुळे यासर्व घडामोडी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जो काही विचार दिला. तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत, ते आम्ही करत आहोत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय. या महाराष्ट्रात मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला ताठमानेने जगण्याची शिकवण दिली. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार या महाराष्ट्रात आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सर्व सामन्यांना न्याय देण्याचं काम आमचं युती सरकार करेल. या राज्याचा सर्वांगिण विकास आमचं सरकार करेल. शेतकरी, कष्टकऱ्यांसह राज्याच्या विकास हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांना वंदन केलं आहे. त्यांचे आशीर्वाद घेतले असून ते माझ्या पाठिशी आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.