शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (15:20 IST)

“दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड आणि तिथे बस : पेडणेकर

kishori pednekar
गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील अभिवादन कऱण्यासाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त केला. तसंच आदित्य ठाकरेंवर टीका करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडंल.
“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार,” असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलायची आहे की उद्धव ठाकरे यांची याचा निर्णय लवकर घ्यावा असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, “दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड आणि तिथे बस, तिथून उड आणि इथे बस असंच करत असतात. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका”.