सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (08:07 IST)

"मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता;संजय राऊतांची नाना पटोलेंवर टीका

sanjay raut
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबई अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले यांनी मुंबईतील प्रभागरचने आक्षेप घेतला. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की,
 
"मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईवर राज्य होतं पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होतं."
 
"पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो,"असंही राऊत म्हणाले.