नवनीत कौर राणा कोण आहे ?

navneet rana
Last Modified मंगळवार, 8 जून 2021 (13:57 IST)
नवनीत राणा लग्नानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढविली होती पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र 2019 च्या निवडणुकीत अपक्ष स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला. त्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दर्शविला.
यापूर्वी नवनीत राणा एक मॉडेल होती आणि त्याने पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले होते. 2011 मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी लग्न करुन त्या राजकारणात शिरल्या.

चर्चेत होतं लग्न
नवनीत आणि रवी राणा यांच्या पहिली भेट बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाली होती. त्यानंतर दोघांचे 2 फेब्रुवारी 2011 ला एका सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झाले. या विवाह सोहळ्यात एकूण 3162 जोडपे विवाह बंधनात अडकली होती. त्यावेळेस रवी राणा आमदार होते म्हणून यांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुब्रत रॉय, बाबा रामदेव आणि विवेक ओबेरॉय यांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
नवनीत राणा यांना पाच भाषांचे ज्ञान
मुंबईमध्ये 3 जानेवारी 1986 साली जन्म झालेल्या नवनीत कौर राणा यांना पाच भाषा येतात. त्या मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रेजी बोलू शकतात. नवनीत राणा यांचे वडील हे भारतीय लष्करात होते. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मॉडेलिंगसाठी शिक्षण सोडलं. मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरूवात करणार्‍या नवनीतने अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केल्यानंतर 'दर्शन' या कन्नड चित्रपटद्वारे करिअरला एक नवीन वळण दिले. यानंतर तेलगू चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले. 2011 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; ...

शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; एकेरी भाषेत टीका करत म्हणाले…
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवारी) सांगली (Sangli) दौ-यावर आले ...

‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ

‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ
राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा आज (शुक्रवारी) वाढदिवस ...

उद्धव ठाकरे : '...तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो'

उद्धव ठाकरे : '...तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो'
शिवसेनेचा परंपरागत 'दसरा मेळावा' मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे ...

अफगाणिस्तान: शिया मशिदीवर पुन्हा हल्ला, आतापर्यंत 32 जण ठार ...

अफगाणिस्तान: शिया मशिदीवर पुन्हा हल्ला, आतापर्यंत 32 जण ठार आणि 53 हून अधिक जखमी
अफगाणिस्तानमधील कंधार येथील शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात किमान 32 जण ठार झाले आहेत. या ...

IPL 2021: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी टी -20 क्रिकेटमध्ये ...

IPL 2021: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी टी -20 क्रिकेटमध्ये खास तिहेरी शतक करण्यासाठी उतरेल
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 ...