मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (17:48 IST)

गर्भाशयाच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी हे आसन करा

स्त्रियांना आपल्या आयुष्यात अशा बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो,ज्यांच्या बद्दल त्यांना सांगायला देखील भीती वाटते.अशा परिस्थितीत योग त्यांच्या साठी मदतगार होतो.गर्भाशयाच्या त्रासापासून मुक्ती साठी देखील योग प्रभावी आहे. ते केल्याने त्यांना कोणत्या ही त्रासापासून मुक्ती मिळू शकते.चला तर मग जाणून घेऊ या. कोणते आहे ते योगासन.
 
*  पश्चिमोतानासन
 
हे आसन बसून केले जाते.योगांमध्ये आसनाला खूप महत्त्व आहे.लहान पणा पासूनच मुलांना देखील योगा करण्याचा सल्ला दिला जातो.जो व्यक्ती लहान पणा पासूनच योगा करतात .त्यांना वय वाढल्यावर देखील काहीच त्रास होत नाही.वजन कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.
स्त्रियांनी हे आसन नियमित केल्याने गर्भाशय आणि मासिक पाळीच्या त्रासापासून आराम मिळतो.तसेच हे आसन केल्याने निद्रानाशाच्या समस्येत देखील आराम मिळतो.चला हे करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेऊ या.
 
कृती- 
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम बसून घ्यावे.दोन्ही पाय लांब करून न दुमडता आपल्या हाताने पायाचे अंगठे स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अंगठ्यांना स्पर्श करताना लक्षात ठेवा की आपली छाती गुडघ्याला स्पर्श झाली पाहिजे.या अवस्थेत 20 ते 30 सेकंद राहून दीर्घ श्वास घ्या.
 
फायदे- 
* मन शांत करतो.तणाव कमी करतो.
* शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्त करतो.
* पचनतंत्रात सुधार करतो.
* उच्च रक्तदाब,निद्रानाश,वंध्यत्व ,चे उपचार या आसनाने केले जाऊ शकते.
* पोट आणि कुल्ह्याची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
* गर्भाशयाच्या समस्येतून आराम मिळतो.
 
टीप- जर आपल्याला दमा,अतिसार,किंवा पाठीत वेदना आहे तर आपण हे आसन करणे टाळावे.गरोदर महिलांनी हे आसन करू नये.