मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (11:41 IST)

निरोगी फुफ्फुसांसाठी हे आसने करा

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.या आजाराशी लढा देण्यासाठी आपले फुफ्फुस बळकट आणि निरोगी असले पाहिजे. या साठी काही व्यायाम सांगत आहोत.जे करून आपण आपले फुफ्फुसे निरोगी ठेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 अनुलोम -विलोम - हे आसन संपूर्ण शरीराच्या स्वच्छतेसाठी आणि मेंदू मजबूत करण्यासाठी चांगले मानले आहे.
 
2 भ्रस्त्रिका -हे आसन केल्याने फुफ्फुस बळकट होतात.तसेच आक्सिजनची पातळी देखील चांगली राहते.
 
3 कपाळ भाती- कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ हा प्राणायाम शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी उत्कृष्ट मानला जातो.
 
4 उद्गीथ -सुखासनात बसून श्वासोच्छवासाला केंद्रित करणारे हे आसन केल्याने श्वासाचे आजार दूर होतात आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते.
 
5 उष्ट्रासन-वज्रासनात बसून केले जाणारे हे आसन फुफ्फुसांना जास्त प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारे आहे.परंतु गुडघ्याचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये.
 
 6 नौकासन-हे आसन फुफ्फुसांना मजबूत करण्यासह श्वासाशी संबंधित समस्या दूर करण्यात प्रभावी आहे.
 
7 त्रिकोणासन -हे आसन फुफ्फुसांना मजबूती देण्यासह त्यांची स्वच्छता देखील करण्याचे काम करतो.
 
8 भुजंगासन -हे आसन केल्याने फुफ्फुस आणि हृदयाच्या अवरुद्ध नसांना उघडण्यात मदत होते आणि हे शरीरातील चयापचय किंवा मेटॅबॉलिझम सुधारते.
 
9 मंडूकासन - हे आसन केल्याने पचन तंत्र व्यवस्थित राहते आणि फुफ्फुसे देखील मजबूत होतात.
 
10 धनुरासन- 10 ते 15  वेळा श्वासोच्छवास फुफ्फुसात रोखण्याचे प्रयत्न करणाऱ्या या आसनाला केल्याने फुफ्फुसांना मजबूत होण्यास मदत मिळते.
 
टीप - कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या असल्यास हे सर्व आसन आपल्या डॉक्टरांच्या सल्ला घेतल्या शिवाय करू नये.आणि हे सर्व आसन योग प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली करावे.