शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 5 मे 2022 (09:03 IST)

कलिंगडाचे बियाणे हृदय आणि मन तंदुरुस्त ठेवण्यात फायदेशीर

ग्रीष्म ऋतु म्हटलं की कलिंगडं आलाचं. आपण कलिंगड चवीने खातो पण त्याच्या बिया मात्र फेकून देतो. कलिंगडाच्या बिया खूप फायदेशीर आहे चला त्याचे फायदे जाणून घ्या.
 
कलिंगडाच्या बिया मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे चांगले स्रोत आहेत.ते अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट म्हणून कार्य करतात आणि हृदय निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करण्यास मदत करतात. त्यात असलेले मॅग्नेशियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत आणि आयरन मुळे शरीराच्या वेगवेगळ्याअवयवांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो.
 
कलिंगडाच्या बियांचे 8 फायदे जाणून घ्या.
 
1 कलिंगडाच्या बिया सोलून आतील गर खाल्ल्याने शरीराला सामर्थ्य मिळतं. मेंदूचे अशक्त मज्जातंतू मजबूत होतात, गुडघ्याजवळ सूज देखील बरे होते. हे मन आणि हृदय निरोगी ठेवण्यास देखील प्रभावी आहे.
 
2 या मध्ये असलेले डायट्री फायबर पाचन तंत्राला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि पाचक समस्या दूर करण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही हे खूप फायदेशीर आहे.
 
3 कावीळसारख्या समस्या उद्भवल्यास कलिंगडाच्या बियांचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकतं. या व्यतिरिक्त ते संक्रमणापासून दूर ठेवण्यास ही मदत करतात.
 
4 या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आढळतं, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. शिरा पसरण्याचा समस्येवर देखील फायदेशीर आहे आणि जास्त ताण घेतल्यास त्यांचे सेवन केल्यास तणाव कमी होतो.
 
5 कलिंगडाच्या बियांपासून बनलेल्या चहाचे नियमितपणे सेवन केल्याने किडनीचा त्रास टाळता येतो. किडनीत स्टोन असला त्यावरही हे फायदेशीर आहे.
 
6 कलिंगडाचे बियाणे चावून चावून चघळल्याने दाताचा पायरिया रोग बरा होतो.
 
7 कलिंगडाच्या बियाणांच्या गर मध्ये खडीसाखर, शोप बारीक करून खाल्ल्याने गर्भावस्थेत बाळाची वाढ चांगली होते.
 
8 कलिंगडाची बियाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे शरीराचे अवयव चांगले ठेवून निरोगी राहण्यासाठी प्रवृत्त करतात. आपण हे कसे ही खाऊ शकता किंवा चहा बनवून देखील पिऊ शकता.