शेतकऱ्यांना बोगस खते, बियाणे दिल्यास दुकानासोबतच कंपनी मालकही तुरुंगात - दादा भुसे
शेतकऱ्यांना बोगस बियाणे, रासायनिक खते दिल्यास त्या दुकानदाराबरोबर कंपनीच्या मालकाविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे, रासायनिक खतांची कमतरता भासणार नसल्याचे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिलं.
याबरोबरच बोगस बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांना दिल्यास त्या दुकानदाराबरोबर कंपनीच्या मालकाविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असं दादा भुसे म्हणाले.