मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (10:49 IST)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी औरंगाबादमध्ये

Governor Bhagat Singh Koshyari in Aurangabad राज्यपाल भगतसिंह कोश्यारी औरंगाबादमध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेसुद्धा औरंगाबादमध्ये दाखल झाल्याने याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
 
योगायोग म्हणजे, औरंगाबादच्या ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी आहेत, नेमक्या त्याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी मुक्कामास उतरले आहेत.
 
केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या मुलाचं काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे लग्न झालं होतं. त्याचा स्वागत समारंभ औरंगाबादमध्ये होणार आहे. तिथं उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल औरंगाबादेत आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राज ठाकरे हेसुद्धा या कार्यक्रमास हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.