सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (10:00 IST)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादेत अटींसह सभा आज

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज, 1 मे 2022 रोजी औरंगाबादमध्ये सभा आहे. मात्र, या सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत. सभेसाठी या अटींचं पालन राज ठाकरेंना करावं लागणार आहे. अशा 16 अटी औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या आहेत.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. औरंगाबादच्या या जाहीर सभेत राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याकडे आता महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे शनिवारीच पुण्याहून औरंगाबादला पोहोचले होते. राज ठाकरे शनिवारीच पुण्याहून औरंगाबादला पोहोचले होते. कडक ताकीद देताना पोलिसांनी सांगितले की सभेला उपस्थित असलेल्या सर्वांनी कोणतीही आक्षेपार्ह किंवा दुखावणारी टिप्पणी केली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 
सभेसाठी मुख्य अट म्हणजे, "सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा वर्ण प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा- परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी काळजी घ्यावी."
 
ध्वनी प्रदूषण होणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, सामाजिक वातावरण बिघडणार नाही. सामाजिक सलोखा बिघ़डेल असं वर्तन होणार नाही याची खबरदारी सभेदरम्यान घ्यावी लागणार आहे.औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या अटी
 
सर्व अटी नागरिकांना कळवण्याची जबाबदारी आयोजकांवर असल्याचे या रवानगीत म्हटले आहे. या सभेसाठी 15 हजार लोकांनाच बोलावता येईल, वाहतूक नियमांचे पालन करावे लागेल. आक्षेपार्ह घोषणा देता येणार नाही. शस्त्रं, स्फोटक पदार्थ आणता येणार नाहीत, त्यांचं प्रदर्शन करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या अटीत म्हटलं आहे.