मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (10:39 IST)

मोदींच्या घरासमोर जाऊन मी कुराण वाचलं तर...?'-असदुद्दीन ओवेसी

What if I read the Quran in front of Modi's house ...? '- Asaduddin Owaisi मोदींच्या घरासमोर जाऊन मी कुराण वाचलं तर...?'-असदुद्दीन ओवेसी
"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन कुराण वाचणार, असं मी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? आमच्यावर गोळी चालवाल ना?" असा सवाल करत AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राणा दांपत्यावरील कारवाईचं समर्थन केलं आहे.
 
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. यानंतर झालेल्या गोंधळानंतर त्यांनी यातून माघार घेतली.
 
याविषयी बोलताना ते म्हणाले, "मोदींच्या घरासमोर कुराण वाचू असं मी आणि इम्तियाज जलील यांनी म्हटलं तर तुम्ही रॅपिड अॅक्शन फोर्स लावाल, पोलिसांची ताकद लावाल, आमच्यावर गोळी चालवाल... बरोबर की नाही? मग आमचं असं वर्तन बरोबर आहे का? तर नाही. दुसऱ्यांच्या घरासमोर आपण का जात आहात?