1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 2 जून 2021 (13:31 IST)

Maggi आरोग्यास अपायकारक, Nestle ने स्वीकाराले की 60% उत्पादने सुरक्षित नाहीत

दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ( Maggi ) पुन्हा चर्चेत आहे. हेच नव्हे तर नेस्ले ( Nestle) कंपनीने स्वत: स्वीकार केले आहे की त्यांचे बहुतांश प्रोडक्ट हेल्दी नाही. 
 
मॅगी बनवणार्‍या नेस्लेचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये कंपनीच्या 60 टक्के खाद्यपदार्थांच अनहेल्दी असल्याचे सांगितले गेले आहे. नेस्लेच्या या अहवालात असे नमूद केले आहे की कंपनीच्या 60 टक्केपेक्षा जास्त खाद्य व पेय पदार्थ आरोग्यासाठी सुरक्षित नाहीत.
 
विशेष म्हणजे हा अहवाल आल्यानंतर कंपनीने ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत त्वरित आपली उत्पादने विक्रीसाठी ऑफर देण्यास सुरु केले आहे. 
 
रिर्पोटप्रमाणे नेस्लेच्या कन्फेक्शनरी आणि नेस्लेच्याआईसक्रीम आरोग्यासाठी धोकदायक आहे. हे उत्पादने मनुष्याच्या आरोग्याला हानिकारक असल्याचे कळून येत आहे. नेस्लेची कॉफी सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. उल्लेखनीय आहे की नेस्लेच्या सर्वात पॉप्युलर प्रॉडक्ट्समध्ये सर्वातआधी मॅगी असून नंतर नेस्लेची कॉफी आणि इतर उत्पादने येतात.
 
ब्रिटनच्या बिझनेस डेली फायनेंशियल टाइम्समध्ये रिर्पोट प्रकाशित झाली आहे. याप्रमाणे 2021 च्या सुरुवातीलाच टॉप एक्झिक्यूटिव्हस समक्ष  प्रस्तुत एका प्रेझेंटेशनमध्ये सांगितले गेले की नेस्लेच्या उत्पादनांमध्ये सुमारे 37 टक्के प्रॉडक्ट्सला ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टारकडून 3.5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे.
 
या रेटिंगमध्ये 3.5 स्टार म्हणजे  कंपनीप्रमाणे त्यांचे प्रॉडक्ट्स आरोग्यासाठी हिताचे आहे. या रेकिंगमध्ये 5 स्टार बेंचमार्क आहे. जाहीर करण्यात आलेल्या यारिर्पोटप्रमाणे केवळ 37 टक्के उत्पादनेच 3.5 स्टार आहे जेव्हाकि 60 टक्क्यांहून अधिक उत्पादने मानके पूर्ण करीत नाही.
 
नेस्ले यांनी हे विधान केले
कंपनीने हे स्वीकारले की तेआपले प्रॉडक्ट्स सुधारण्यावर काम करतील. कंपनीने म्हटले की काही प्रॉडक्ट्स असे आहेत जे कधीच हेल्दी नव्हते आणि त्यात सुधार केल्यावर देखील ते आरोग्यासाठी फायद्याचे नाही.
 
कंपनीने म्हटले की ते सतत उत्पादने सुधारण्यावर कार्यरत आहे. अनेक प्रॉडक्ट्समध्ये कंपनीकडून शुगर आणि सोडियमच वापर कमी करण्यात येत आहे. मागील 7 वर्षांत  14 ते 15 टक्के साखर आणि सोडियमचा वापर कमी गेला आहे. हे काही काळापासून सुरु असून पुढेही यावर लक्ष दिलं जातं आहे.
 
या प्रकारे होईल बदल
नेस्ले कंपनी स्वत: आपल्या प्रॉडक्ट्समध्ये न्यूट्रिशनल वेल्यू तपासत आहे. प्रॉडक्ट्सची तपासणी करुन रणनीति बदलून यावर काम केलं जाईल. कंपनीप्रमाणे हेआरोग्याशी निगडित प्रकरण आहे आणि उत्पादने टेस्टी आणि आरोग्यासाठी योग्य तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 
 
नेस्लेने म्हटलं की कंपनी आपलं पूर्ण पोर्टफोलियो बदलण्यावर विचार करत आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आवश्यक पोषण आणि संतुलित आहार प्रदान केलं जाईल.